Wednesday, June 12, 2013

कोणाला कधी काय शिकवावं हे आपल्या हातात असतं.
पण कोणाकडून कधी  काय शिकायचं हे आपल्या हातात नसतं .
नियती किंव्हा so called देव वैगेरे,  कधी कोणत्या रुपात येऊन  आपल्याला काय शिकवून जाईल हे कोणीच सांगू शकत नाही …

पाऊस थांबल्यामुळे पत्र्यावर पडणा-या  पावसाच्या थेंबांचा आवाज जरा  जास्तच वाढला होता .
राजूची झोपमोड झाली …

बाल्कनी मध्ये येऊन राजू नि:शस्त्र सैनिका सारखा उभा होता …. पडून गेलेला पाऊस …. थेंबांचा पत्र्यावर पडून वैताग आणणारा आवाज …
helpless  ….
साचलेलं पाणी चुकवून कामावर जाण्यासाठी घाईत असणारे लोक …. भाजीच्या गाडीवरून प्लास्टिक काढून ते डोक्यावर छपरासारखे लावण्याचा प्रयत्न करणारे लोक …
routine …

"पण कोणावर वैतागलोय मी … पाऊस पडून गेल्यानंतरच्या पावसाच्या थेंबांवर कि पडून गेलेल्या पावसावर…. ??
आयुष्यात निसटून गेलेल्या क्षणांवर वैतागायच कि  त्यानंतर येणा-या  क्षणांना सामोरं जायचं …????"


हातात brush घेवून आरशा समोर राजू नुसता उभा होता …बराच वेळ …. खूप वेळ …. माहित नाही नक्की किती वेळ ….

"आरसा साफ करण्यात आयुष्य घालवलं पण चेहऱ्यावरची धूळ साफ केली असती तर आरसा साफ करावा लागला असता का ?
                                                               'गैरसमज … '

गैरसमज हि अशी एक गोष्ट आहे जी समजण्यापलीकडची असते … सगळं समजत असतानाही का होतात हे गैरसमज …………?
                                  दुस-याला समजण्यात होणारी चूक म्हणजे गैरसमज का?
                              मग जवळच्या लोकांबद्दल का होतात गैरसमज ?????   का ???? "यावरून तुम्हाला राजूच साहित्यिक दारिद्र्य लक्षात येईल … पण इथे ते महत्वाचं नाही …
एका विषयातुन दुस-या विषयात न जाता  राजूला समजण्याचा प्रयत्न तिने केला असता तर … ???
तर झाला असता का गैरसमज … ?? !!

पण हि एक बाजू झाली …

तिचा गैरसमज झाला होता?  कि तिचा गैरसमज झालाय असा राजू चा समज झाला होता … ?

"समजत नसतानांही मला सगळं समजतंय असं  दाखवण्यात समजुतदार पणा आहे की समजत असतानां हि  काहीच समजत नाही असा दाखवण्यात समजुतदार पणा आहे … ?"

बाहेर पाऊस आणि थेंबामुळे होणारा पत्र्याचा आवाज अचानक खूप वाढला होता ….

राजू बाहेरचा पाऊस मुक्यानेच पहात होता…  पण पाऊस मात्र त्याचं मुकेपण ऐकण्याचा प्रयत्न करत होता …

पत्र्यावर पडण्य-या थेंबांचा आवाज कमी करणं पावसाच्या हातात नव्हतं…

आपल्या हातात असतं तरी आपण तसं केलं असतं का? ….

राजु चा fuse उडाला होता पण पाऊस मात्र confuse ….


- जयंत पवार

No comments:

Post a Comment