Saturday, July 27, 2013

आज सकाळ झालीच नाही जणू … ढगांनी सूर्याला कुठे लपवलय कुणास ठावूक … 
कि तो स्वत:हून लपलाय कुणास ठावूक …. 
खरं तर खूप मस्त चं romantic वाटतंय सकाळपासून 
ताई किंवा दादाच्या लग्नात लहान मुलं कशी हुंदडत असतात इकडून तिकडे 
तसच काहीस पक्ष्यांचा झालय …. 
मातीच्या मनातला आनंद सुगंधु लागलाय … 
डांबरी रस्त्याला तेज चढलय … 
आपलं आवडतं कुणीतरी न सांगता अचानक आलं तर केवढा आनंद होईल…. तेवढाच झालाय आज 
आता तू थांब जावू नकोस…. खूप वाट पाहायला लावतोस दरवर्षी … यावेळेस वाट पाहायला लावली नाहीस असं नाही
पण तू वेळेत आलायस…. मीच जरा आधीपासून तुझी वाट पाहत होतो …
तू पड …. खूप पड … इतका पड कि तू नव्हतास हे विसरून जावू दे मला …
तू नसलास कि तुझी किंमत कळते … आता तू असताना तुझी किंमत कळावी इतका पड ,,,
अश्रू ने ओली झालेली माती आनंदअश्रुंनी ओली होईल इतका पड … 


जयंत पवार 

Saturday, June 22, 2013

23rd june 2013

"आज फार काही बरं सुचत नाहीय ….
कुणास ठाऊक का ?
पण उगीचच खूप अस्वस्थ वाटतंय ….
काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतंय … काहीतरी विसरल्यासारखं वाटतंय …
पण काय राहून गेलंय ? काय विसरलंय ? "
प्रश्न…
"आयुष्यात बरचं  काही राहून जातं… आणि बरंच काही विसरलहि जातं (अनेकदा ठरवूनच )…
पण नेमक काय विसरलयं  अन काय राहून गेलयं ते आत्ता..  या क्षणी तरी आठवत नाहीय …
खूप प्रयत्न करतोय … पण छे … नाहीच आठवत …
खूप एकटं एकटं  वाटतंय … एका पोकळीत मी आहे अस वाटतंय … "

राजू तंद्रीत बसला होता … बायको नव्या नवरी सारखी नटून आली …

"वट पोर्णिमा आहे आज … आज पहिल्यांदा कुणीतरी मला repeat करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करणार आहे …
हि आज खूप खुश होती ….
मी काहीतरी गमावल्याच्या दु:खात बसलो होतो … पण हि मात्र मला मिळवलयं…  सात जन्मांसाठी ….
याच आनंदात होती … देवाला आज तसं सांगणार हि आहे हि …
पण खरचं मी आहे का हिच्यासोबत?
 निदान या जन्मासाठी तरी ?"
बोचणारा प्रश्न …
"हि मला सर्वस्व समझते … हिच्या आयुष्यात फक्त मीच आहे …. माझ्या पलीकडे आमच्या हीच जगचं  नाही …
हीच जग माझ्यापासून सुरु होतं आणि माझ्यापाशीच संपतं …
पण माझं तसं आहे का ? माझं  जग अजून हि तिच्या बरोबरच  सुरु होतं …. अन तिच्याच सोबत आहे मी … संपतच नाही …
संपवायचं आहे … पण … नाही संपत … "

"मी सात जन्म मिळावा म्हणून हि वडाला साकडं घालून आली होती आणि पुढचे सातही जन्म हि हेच साकडं घालणार  होती …

पुरुषांसाठी का नसतो असा वड किंवा असं  एखादं झाड कि ज्याला फेरे मारून कोणाला तरी कायमचं मागता येईल … ?
पुरुषांना नाही वाटत का कोणासोबत तरी पुढचे काही जन्म काढावेत ?
काही जन्म नाही निदान हा जन्म तरी काढावा… ?
कि देवालाच वाटत नाही असं कि पुरुषांच्या इच्छेप्रमाणे व्हावं?

मला तिला स्विकारता नाही आलं…
किंवा तिने मला नाही स्वीकारलं…
 हिने मला स्विकारलयं…
हिच्या मनासारखं  झालय कि मनाविरुद्ध ?
माहित नाही
पण हिने मला स्विकारलयं… अगदी मनापासून …
पण माझं  काय ??
माझं काय ?

आता मीच वडाला साकडं घालायचं ठरवलंय…
मला तिच्या आठवणीतून … तिच्या जगातून बाहेर काढ …
मला आता हिच्या सोबत जगायचय
हिच्या साठी जगायचय
पुढचे सगळेच जन्म ……

"??????????"

- जयंत पवार


Saturday, June 15, 2013

16 june 2013

पाऊस … धो धो पाऊस …. वेड्यासारखा पाऊस …
इतका पाऊस…  इतका पाऊस….  इतका पाऊस… 
इतका पाऊस कि सगळ विसरायला लावणारा
इतका पाऊस कि खूप प्रयत्नाने पुसलेलं  पुन्हा गिरवणारा

राजू तिच्या आणि त्याच्या नेहमीच्या जागी आला होता …
पावसाचे थेंब उडत होते चेह-यावर ….
पण आज त्याला पावसाचा त्रास होत नव्हता …
राजू च्या गालावर पावसाचे थेंब होते कि ……………… तिच्या विरहाचे ???

तसाच उभा होता … बराच वेळ

उभा असायचा बराच वेळ पावसात तिची वाट पाहत
खरं  तर त्याला पाऊस आवडायचा नाही … वैतागायचा तो पावसात तिची वाट पाहताना
गाड्यांमुळे अंगावर चिखल उडू नये म्हणून त्याची खूप धडपड चाले
छत्री उडवायला येणाऱ्या वा-यावर त्याचा विशेष राग …
"या पावसाला सरळ एका रेषेत पडताच येत नाही … तिरका पडून , माझ्या छत्रीत घुसून मला मुद्दाम भिजवतो हा "
राजूची नेहमीची तक्रार
तिला हसू हि येतं  आणि खूप छान हि वाटत
"यामुळेच तू मला खूप आवडतोस" असं  ती राजूला नेहमी म्हणत असे आणि तसं  म्हणताना त्याच्या केसातून हात फिरवत असे

केसातून हात फिरवून पावसाचे थेंब राजूने झटकले …  पाऊसपण  खूप हट्टी …तिच्या आठवणी सारखा …. पुन्हा पावसाचे थेंब राजूच्या डोक्यात

"एका छत्रीतून चालण्याचा तुझा हट्ट का?"  राजू ची चिडचिड
ती त्याचा हात धरून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे चालतेय

"खूप भिजायला होतं ग "
"त्याचसाठी तर पाऊस येतो रे"
"भिजू नये म्हणूनच छत्री बनवलीय न? मग छत्री बनवणारे वेडे आहेत का ?  "
"खूप शहाणे आहेत " असं  म्हणून तिने त्याचा हात जर घट्टच पकडला …

ती रस्त्यात साचलेल्या पाण्यात निर्धास्त पणे पाय टाकत चालत होती
त्याचा मात्र साचलेल पाणी  चुकवण्याचा केविलवाणा प्रयत्न …

त्याचा चेह-यावर अजूनही खूप थेंब होते … पावसाचे ??? … कि ……

जयंत पवार

Friday, June 14, 2013

15th june 2013


बायकोने आज छान चिकन केलं होतं जेवायला
पण मीठ कमी पडलं .

"मीठ कमी आहे…  मीठ दे "  राजू ची order

बायकोने मीठ आणून दिलं … मीठ टाकताच चिकनला त्याची स्वत:ची अशी चव आली ….

"मीठ सुयोग्य प्रमाणात असतं तर मला मिठाची आठवण आली असती का?

जेवणात मीठ असतं तेंव्हा ते आहे याची आठवणही होत नाही … ते नसतं तेंव्हा त्याचं नसलेपण जाणवतं ….

मिठाला स्वतंत्र अस्तित्व नसतच मुळी … मीठ खारट असतं … जेवणात मिसळल्यावर ते जेवणाची चव वाढवतं ….

काही माणसं अशीच असतात का मिठासारखी …. ??? "


राजू बेडरूम मध्ये येरझा-या घालत होता …

"आयुष्यात सगळे असतानाही आपण एकटेच आहोत … "

…. मनातली सल … 

…. येरझा-या चालूच होत्या …

"का नाही मी कोणासाठी महत्वाचा … ?
का माझ्या मित्रांना मी महत्वाचा वाटत नाही … ?
का माझ्या रक्ताच्या नात्याला माझं महत्व कळत नाही … ?
तिला तर मी नसतानाच माझी आठवण जास्त येत होती … सोबत असायचो  तेंव्हा मात्र ती तशी नाही वागली कधीही  …. का ?


पण हीच मात्र तसं नाही … मी सोबत असतानाही हि  मला खूप miss करते …
पण तसं दाखवत मात्र नाही …
माझ्या मनातलं दु:ख ती ओठांनी अलगद टिपून घेते …
माझ्या डोळ्यात बघून तिला माझ्या मनातली सल कळते …. केसांमधून हात फ़िरवते…
काळजी घेते खूप … "


राजू बेड वर डोळे मिटून शांत पडला होता … पण झोपला मात्र नव्हता …
"हि  आली …माझा संसार नेटका व्हावा म्हणून दिवसभर राबून हि  आली … अंगावर पांघरून घातलं  … आणि शांत झोपली … "

राजू जागाच होता … बायकोकडे पाहत होता … पाहण्याचा प्रयत्न करत होता … पहिल्यांदा ….

" खरंच  मीठ कोण आहे? "
"मी कि हि ?"


- जयंत पवार

Wednesday, June 12, 2013

कोणाला कधी काय शिकवावं हे आपल्या हातात असतं.
पण कोणाकडून कधी  काय शिकायचं हे आपल्या हातात नसतं .
नियती किंव्हा so called देव वैगेरे,  कधी कोणत्या रुपात येऊन  आपल्याला काय शिकवून जाईल हे कोणीच सांगू शकत नाही …

पाऊस थांबल्यामुळे पत्र्यावर पडणा-या  पावसाच्या थेंबांचा आवाज जरा  जास्तच वाढला होता .
राजूची झोपमोड झाली …

बाल्कनी मध्ये येऊन राजू नि:शस्त्र सैनिका सारखा उभा होता …. पडून गेलेला पाऊस …. थेंबांचा पत्र्यावर पडून वैताग आणणारा आवाज …
helpless  ….
साचलेलं पाणी चुकवून कामावर जाण्यासाठी घाईत असणारे लोक …. भाजीच्या गाडीवरून प्लास्टिक काढून ते डोक्यावर छपरासारखे लावण्याचा प्रयत्न करणारे लोक …
routine …

"पण कोणावर वैतागलोय मी … पाऊस पडून गेल्यानंतरच्या पावसाच्या थेंबांवर कि पडून गेलेल्या पावसावर…. ??
आयुष्यात निसटून गेलेल्या क्षणांवर वैतागायच कि  त्यानंतर येणा-या  क्षणांना सामोरं जायचं …????"


हातात brush घेवून आरशा समोर राजू नुसता उभा होता …बराच वेळ …. खूप वेळ …. माहित नाही नक्की किती वेळ ….

"आरसा साफ करण्यात आयुष्य घालवलं पण चेहऱ्यावरची धूळ साफ केली असती तर आरसा साफ करावा लागला असता का ?
                                                               'गैरसमज … '

गैरसमज हि अशी एक गोष्ट आहे जी समजण्यापलीकडची असते … सगळं समजत असतानाही का होतात हे गैरसमज …………?
                                  दुस-याला समजण्यात होणारी चूक म्हणजे गैरसमज का?
                              मग जवळच्या लोकांबद्दल का होतात गैरसमज ?????   का ???? "यावरून तुम्हाला राजूच साहित्यिक दारिद्र्य लक्षात येईल … पण इथे ते महत्वाचं नाही …
एका विषयातुन दुस-या विषयात न जाता  राजूला समजण्याचा प्रयत्न तिने केला असता तर … ???
तर झाला असता का गैरसमज … ?? !!

पण हि एक बाजू झाली …

तिचा गैरसमज झाला होता?  कि तिचा गैरसमज झालाय असा राजू चा समज झाला होता … ?

"समजत नसतानांही मला सगळं समजतंय असं  दाखवण्यात समजुतदार पणा आहे की समजत असतानां हि  काहीच समजत नाही असा दाखवण्यात समजुतदार पणा आहे … ?"

बाहेर पाऊस आणि थेंबामुळे होणारा पत्र्याचा आवाज अचानक खूप वाढला होता ….

राजू बाहेरचा पाऊस मुक्यानेच पहात होता…  पण पाऊस मात्र त्याचं मुकेपण ऐकण्याचा प्रयत्न करत होता …

पत्र्यावर पडण्य-या थेंबांचा आवाज कमी करणं पावसाच्या हातात नव्हतं…

आपल्या हातात असतं तरी आपण तसं केलं असतं का? ….

राजु चा fuse उडाला होता पण पाऊस मात्र confuse ….


- जयंत पवार

Friday, June 7, 2013

Farmville

8th june 2013
Farm ville राजू चा आवडता Facebook game.
सगळं खोट असतं . पण ख-याचा आभास असतो.

आज तिची वाट पाहत तो खूप वेळ उभा होता … एक सिगारेट लाईट केली ….
mobile चेक केला ….

"राजू "  सीमा चा आवाज …. राजू सिगारेट विझवून सीमाशी बोलायला लागला …

इकडे रिक्षा मिळत नाहीय म्हणून ती खूप अस्वस्थ … अचानक मेसेज टोन वजतो.
"today  nt possible... can v meet tmmrw... plz... urgent meeting aahe"

chating च्या  tone ने राजू भानावर येतो ….
"खरंच  बरोबर होत का जे मी वागलो ते.? कि त्या वयात असं असतच ?
पण आजच का हे सगळ आठवतंय … मी नाही तिला  फसवल …. माझा हेतू हि नव्हता तसा कधी हि
त्यादिवशी ती वेळेत आली असती तर कदाचित मला सीमा भेटलीच नसती ना !!! 

ती आज हि मला miss  करते खूप … पण मला येते का तिची आठवण …????

मला तिच्यात काय आवडल हे नाही माहित …. पण प्रेम होत तिच्यावर     खूप प्रेम होत…
मीच  तिला माझ्या पासून दूर जायला  लावल…
'अरे माझ्या सोबत लग्न केल असत तर तिला खूप त्रास सहन करावा लागला असता …
मीच अजून सेटल नाहीय … म्हणून मी तिच्यासाठी  हा निर्णय घेतला '   असं  खोटं  सांगताना मला कधीही गिल्टी फील झालं नाही ….

सीमा बरोबरच्या १० मिनिटांचा मोह आवरला असता तर……. "

राजू computer वरून उठला … farm ville  चालूच होत… आज तर तो पिकांना पाणीही द्यायला विसरला …
डोक्यावर भूक लागल्याचे symbol घेवून प्राणी फिरत होते.

कोणाच्या मनात काय आहे हे त्या व्यक्ती कडे बघून कळल असत तर?  प्रत्येकाच्या डोक्यावर देवाने एक symbol दिला असता तर?
 ज्यात ज्या ज्या वेळेला त्या व्यक्तीला काय वाटतंय त्याच्या काय अपेक्षा आहेत हे कळल असत
खूप सोप्प झाल असत आयुष्य …. कुणी रागवलही नसत ना मग …
तुला माझ्या मनातल कळतच नाही
एवढ कस रे नाही कळत तुला … ठोम्ब्या कुठचा
समझ न यार बस क्या …

अरे नाही कळत मला कुणाच्या मनात काय आहे ते … नाही वाचता येत मला चेहरा …
डोळ्यात बघून मनातल नाही ओळखता येत मला … मौनाची भाषा तर मुळीच काळत नाही …
leave me alone "

बाल्कनीतून खाली अंधारा रस्ता … ठराविक अंतराने महापालिकेच्या दिव्यांचा पडलेला गोलसर कवडसा (actually उजेड )
एखादी bike , एखादी rickshaw , उशिरा कामावरून परतणारे …. सगरेटी फुंकत जाणारा एक group

"मी तिचा हात हात घेतल्यावर काय छान लाजली होती … खरतर मी हि आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीचा हात पकडला होता ,,,
बराच वेळ शांततेत गेला …. घरी जातानाही आम्ही एक ठराविक अंतर ठेवून चालायचो ….
सुंदर होते ते दिवस………  पण ते असेच सुंदर राहिले असते का ?
मी प्रेमाने धरलेला तिचा  हात आता मला जबाबदारी म्हणून धरावा  लागला असता का?
तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला तिच्या पासून लांब रहाव लागल असत का?
आता ती माझ्या आयुष्यात नाही … मला नाही वाईट वाटत आता …
पण तरीही तिला पाहिल कि, तिच नुसत नाव ऐकल कि छाती फुटेल इतक का धडधडत?"

farmville चे प्राणी उपाशीच होते ,,, राजू ने computer बंद केला तरी तरी ते तसेच राहणार
"खोट जग असत ते .... पण ख-या जगाच काय …. ख-या माणसांच काय
त्यांच मन खर असतं , त्यातल्या भावना ख-या असतात , त्यात स्वार्थ नसतो …
मग relationship अशी बंद करता येते? computer सारखी …
बंद करता हि येईल पण पुन्हा चालू कशी करणार …"
ढगांच्या पडद्याआडून चांदोमामा सगळ पहात होता ….
पण राजू ने डोळ्यावर कसला पडदा चढवला होता कुणास ठावूक ….


- जयंत पवार


सन १८५७ चा उठाव …. शाळेत शिकवला होता … अलीकडच्या काळात आमिर खान ने आठवण करून दिली .
गाई व डुकराच्या चरबीचे आवरण असलेली काडतुसे
धर्म भ्रष्ट होईल म्ह्नणून बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या ३४व्या बी. एन. आय तुकडीच्या सैनिकांनी काडतुसे वापरायला दिलेला नकार
अन्याय विरुद्ध मंगल पांडे ने केलेला उठाव ……

अगदी सहज नाही आठवलं … आणि सहज सुचलही नाही … आणि तितका गांभिर्याने विचार करण्यासारखं हि काही नाही ….
हा भारताचा भूतकाळ होता…. वर्तमान काळ तर बघतोच आहे आपण …
आत्ताच्या काळात मंगल पांड्येला च आपण वेड्यात काढू
जसा अण्णांच्या आंदोलनाला आपण उस्फुर्त पाठींबा दिला… सगळ्यांनीच… वा !!!! क्या बात है … पण पुढे काय झालं ? ते एकटेच पडलेत...
असो या विषयावर जास्त नाही बोलत मी ( प्रत्येकाची वेगळी मतं असू शकतात. )
तर काय म्हणत होतो मी ..... हं .. आठवलं … ( सामान्य माणूस आहे हो मी कोणतीही गोष्ट खूप लवकर आणि खूप सहजतेने विसरण्याचं कसब अंगिकरलय मी सुद्धा )

सन २०____ चा उठाव .. (साल कोणतं ते आपण सगळे ठरवूया )
भ्रष्टाचार आणि गलथान कारभाराचं आवरण असलेलं सरकार .. ( सरकार मध्ये नसलेले राजकारणी सुद्धा तसेच असतात हे सुज्ञास सांगायला नको )
देश बुडेल ( almost बुडलाच आहे ) म्हणून भारतातील तरुणांनी सरकार विरुद्ध आणि system विरुद्ध केलेला उठाव , पुकारलेलं बंड. बंद नाही हं … बंड .. बंद तर कोणीही उपटसुंभ करू शकतात या देशात .. त्यासाठी धैर्य लागत नाही.. देशप्रेम वैगेरे तर मुळीच लागत नाही .. पण बंड करणं सोप्प नाही … त्यासाठी बरंच पाणी पुलाखालून जावं लागतं .....
(sorry पाण्याचा उल्लेख अनावधानाने आला ... पाणी प्यायल्यावर सु सु पण लागते )

लोक अन्याय विरुद्ध बोलायला लागलेत ...
खोट्या आश्वासनांना बळी पडत नाहीत हल्ली ...
भ्रष्ट लोकांच्या कॉलरला धरून त्यांना त्यांचा पोस्ट वरून खेचून काढतायत.....
कोर्टाचे निकाल सरकारच्या बाजूने नाही तर न्यायाच्या बाजूने लागतायत ….
भारताची खऱ्या लोकशाही च्या दिशेने वाटचाल ...
फक्त जातीच्या आधारावर कोणालाही कोणतीही नोकरी न देता शिक्षणाच्या आधारावर दिली जावी याबद्दल तरुणांची आग्रही भूमिका ... समान नागरी कायदा व्हायलाच हवा हा देखील आंदोलानातील एक महत्वाचा मुद्दा....
सरपंच , नगरसेवक यापासून ते खासदारा पर्यंत सगळ्यांना सामाजिक भान , किमान पदवी शिक्षण या basic गोष्टी गरजेच्या ….

जावू दे मलाच काळात नाहीय मी काय बोलतोय आणि का बोलतोय ? साधा वाक्यांचा क्रम हि निट लावता येत नाहीय मला … कोणते मुद्दे मांडायचे आहेत याचाही गोंधळ उडालाय माझ्या मनात …
पण एक मात्र नक्की कि मी अस्वस्थ आहे ...
खुप अस्वस्थ
आताशा कोणाची भीती हि वाटेनाशी झालीय ..
किती दिवस भ्यायचं ?
साहेबांच्या गाडीची पार्किंग ची जागा आहे तुम्ही इथे पार्क नाही करायच … अरे रस्ता काय तुमच्या बापाचा आहे …
हेल्मेट घातला नाही कि दंड भरा… पोलिसांना हा नियम लागू नाही .. त्यांच्या सन्माननीय पिताश्रीनी कायदा बनवला आहे बहुतेक
या आणि अशा खूप गोष्टी आहेत
तुमच्या हि मनात असतील
share करूयात का ?
मनातलं कोणाशी तरी बोलला कि हलकं वाटतं असं म्हणतात .. आपण तसेही उपरे आहोत या देशात .. चला एकमेकांना सोबत करूया
मनातली खद्खद share करूया .


JAYANT PAWAR

काय चाललय हे आयुष्यात !!!??

6th june 2013
 
"काय चाललय हे आयुष्यात !!!?? खरचं 'मला' हा प्रश्न पडलाय कि काय चाललय हे आयुष्यात?
कारण माझ आयुष्य हे असं कधीच नव्हतं. फार सरळ होतं ते…. सहज होतं…
आताशा तर माझा विश्वासच बसत नाही कि हे माझं आयुष्य आहे म्हणून
अचानक एवढी वळणं … एवढे चढउतार …. अनपेक्षित घटना …. "

स्वत:शीच विचार करत राजू त्याचा आवडत्या समुद्रकिना-यावर बसला होता मावळतीला निघालेल्या भास्काराकडे पहात…
एरवी तो मावळतीच्या वेळी आकाशात पसरलेल्या लालीचा साज पहात असे… रंगांचे मुक्त खेळ पहात असे …
समुद्राची गाज पहात असे… कुठेतरी क्षितिजावर आलेली चंद्राची जाग पहात असे …
पक्षांची घरी परतण्याची घाई बघण्यात त्याला विलक्षण गंमत वाटे
पण आज का कुणास ठाऊक त्याच्या मनात आयुष्याविषयी विचार येत होते…

"आयुष्य !!!! असं का असतं? टी . व्ही . चा रिमोट असतो तसा आयुष्याचा का नसतो ?
म्हणजे स्वत:च्या मर्जी प्रमाणे ते operate करता आलं असतं . आयुष्य हल्ली वाट्टेल तसं behave करायला लागलाय…
वाट्टेल तसं वागतंय … हे माझं आयुष्य आहे पण माझ्या मनाप्रमाणे हल्ली वागतच नाही
हां तसं म्हंटल तर ते या आधी हि माझ्या मनाप्रमाणे नव्हतच वागत… फक्त त्याच्या वागण्याच काही वावगं वाटायच नाही किंबहुना मला ते खटकायचं नाही ..
खरंतर या आधी मी इतक्या प्रमाणात आणि अशा पद्धतीने, आयुष्याचा आणि ते हि माझ्या, स्वत:च्या, कधीच विचार केला नव्हता …
…………………. …………………………………………. "

किना-यावरची तांबूस शाई आता काळसर पडत चालली होती …… torch घेवून चांदोमामा किना-यावर भरकटलेल्या पक्षांना वाट दाखवण्यात गर्क होते ….
आज चांदोमामांचही राजू कडे लक्ष नव्हतं अर्थात राजू च हि त्यांचेकडे नव्हतं …
हळू हळू नोकरीच्या भरतीसाठी तरुणांची जशी गर्दी होते तशी लाटांची गर्दी वाढायला लागली होती …
उजवा पाय पसरून , डावा पाय दुमडुन , दोन्ही हात मागे वाळूवर टेकवून … रेलून बसल्या सारखा राजू बसला होता .
लाटा त्याच्या उजव्या पाया खालून येउन त्याच्या ढुंगणाखालून वाळू सरकवून नेत होत्या

"आयुष्याचाही असंच असतं ते कधी आपल्या गांडी खालून काय काढून नेईल ते कळतही नाही …
पण होतं काय माझ्या कडे जे त्याने नेलंय ?????
होतं…. हो होतं… होतंच मुळी … खूप काही होतं…
मी कोणाची तरी जबाबदारी होतो … कोणाची तरी काळजी होतो … कोणाचा तरी विश्वास होतो … कोणाची तरी अपेक्षा होतो… कोणाचं तरी निस्वार्थ प्रेम होतो….
आता जबाबदारी, काळजी, विश्वास, अपेक्षा, प्रेम सगळं तसच आहे फक्त prospective change झालायं . "

मागून three fourth पूर्ण भिजली होती .
"लाटांची काय चूक असते ना … त्या नेमून दिलेल्या वेळेला , नेमून दिलेल्या अंतरापर्यंत , नेमून दिलेल्या प्रमाणात येणारच
त्यांच कामच आहे ते … कोणाच्या आयुष्यात काय चाललय याच्याशी त्या लाटांनाहि काही देणं घेणं नसतं अन त्या समुद्रालाही ….
आपणच उगाच अर्थ लावत बसतो …. समुद्रावरची भीषण शांतता माझ्या आयुष्यासारखीच भासतेय मला … वैगेरे वैगेरे
असं काही नसतं … सगळी चुत्यागिरी आहे …
हो सगळी चुत्यागिरी आहे
का कोणाच्या तरी आठवणीने डोळ्यात पाणी तरळतं ?
का कोणीतरी रस्त्यात दिसल्यावर छाती फुटेल इतकं धडधडतं?
बाप वेळेत घरी नाही आला तर का इतकी काळजी वाटते?
आई घरी नसल्यावर का चैन पडत नाही ?
एकदा पाहून आयुष्यभराची जोडीदार म्हणून निवडलेल्या बायको विषयी इतकं प्रेम कसं निर्माण होतं?
२-३ दिवस मित्र नाही भेटला तर काय रे भोसडीच्या, मादरचोद, कुठे होतास? विसरलास? एक फोन नाही करता येत असं म्हणून त्याला मिठी का मारावीशी वाटते?"

"आयुष्य असंच असतं … आयुष्य असंच होतं …
कि आयुष्य असं नसणारेय …… कि मीच आयुष्यात नसणारेय … इथून पुढे ……
एकटेच असतो आपण … रस्त्यावरून चालताना गर्दी असते पण तरी हि आपण एकटेच असतो ना . "
राजू अंधा-या किना-यावरून एकटाच चालला होता….
आता चांदोमामा त्याच्या torch ने राजू ला अंधारात वाट दाखवण्याचा निरर्थक प्रयत्न करत होता …
राजूचं अजून हि त्याच्याकडे लक्ष नव्हतं
बिच्चारा …

By
जयंत पवार