Friday, June 7, 2013

काय चाललय हे आयुष्यात !!!??

6th june 2013
 
"काय चाललय हे आयुष्यात !!!?? खरचं 'मला' हा प्रश्न पडलाय कि काय चाललय हे आयुष्यात?
कारण माझ आयुष्य हे असं कधीच नव्हतं. फार सरळ होतं ते…. सहज होतं…
आताशा तर माझा विश्वासच बसत नाही कि हे माझं आयुष्य आहे म्हणून
अचानक एवढी वळणं … एवढे चढउतार …. अनपेक्षित घटना …. "

स्वत:शीच विचार करत राजू त्याचा आवडत्या समुद्रकिना-यावर बसला होता मावळतीला निघालेल्या भास्काराकडे पहात…
एरवी तो मावळतीच्या वेळी आकाशात पसरलेल्या लालीचा साज पहात असे… रंगांचे मुक्त खेळ पहात असे …
समुद्राची गाज पहात असे… कुठेतरी क्षितिजावर आलेली चंद्राची जाग पहात असे …
पक्षांची घरी परतण्याची घाई बघण्यात त्याला विलक्षण गंमत वाटे
पण आज का कुणास ठाऊक त्याच्या मनात आयुष्याविषयी विचार येत होते…

"आयुष्य !!!! असं का असतं? टी . व्ही . चा रिमोट असतो तसा आयुष्याचा का नसतो ?
म्हणजे स्वत:च्या मर्जी प्रमाणे ते operate करता आलं असतं . आयुष्य हल्ली वाट्टेल तसं behave करायला लागलाय…
वाट्टेल तसं वागतंय … हे माझं आयुष्य आहे पण माझ्या मनाप्रमाणे हल्ली वागतच नाही
हां तसं म्हंटल तर ते या आधी हि माझ्या मनाप्रमाणे नव्हतच वागत… फक्त त्याच्या वागण्याच काही वावगं वाटायच नाही किंबहुना मला ते खटकायचं नाही ..
खरंतर या आधी मी इतक्या प्रमाणात आणि अशा पद्धतीने, आयुष्याचा आणि ते हि माझ्या, स्वत:च्या, कधीच विचार केला नव्हता …
…………………. …………………………………………. "

किना-यावरची तांबूस शाई आता काळसर पडत चालली होती …… torch घेवून चांदोमामा किना-यावर भरकटलेल्या पक्षांना वाट दाखवण्यात गर्क होते ….
आज चांदोमामांचही राजू कडे लक्ष नव्हतं अर्थात राजू च हि त्यांचेकडे नव्हतं …
हळू हळू नोकरीच्या भरतीसाठी तरुणांची जशी गर्दी होते तशी लाटांची गर्दी वाढायला लागली होती …
उजवा पाय पसरून , डावा पाय दुमडुन , दोन्ही हात मागे वाळूवर टेकवून … रेलून बसल्या सारखा राजू बसला होता .
लाटा त्याच्या उजव्या पाया खालून येउन त्याच्या ढुंगणाखालून वाळू सरकवून नेत होत्या

"आयुष्याचाही असंच असतं ते कधी आपल्या गांडी खालून काय काढून नेईल ते कळतही नाही …
पण होतं काय माझ्या कडे जे त्याने नेलंय ?????
होतं…. हो होतं… होतंच मुळी … खूप काही होतं…
मी कोणाची तरी जबाबदारी होतो … कोणाची तरी काळजी होतो … कोणाचा तरी विश्वास होतो … कोणाची तरी अपेक्षा होतो… कोणाचं तरी निस्वार्थ प्रेम होतो….
आता जबाबदारी, काळजी, विश्वास, अपेक्षा, प्रेम सगळं तसच आहे फक्त prospective change झालायं . "

मागून three fourth पूर्ण भिजली होती .
"लाटांची काय चूक असते ना … त्या नेमून दिलेल्या वेळेला , नेमून दिलेल्या अंतरापर्यंत , नेमून दिलेल्या प्रमाणात येणारच
त्यांच कामच आहे ते … कोणाच्या आयुष्यात काय चाललय याच्याशी त्या लाटांनाहि काही देणं घेणं नसतं अन त्या समुद्रालाही ….
आपणच उगाच अर्थ लावत बसतो …. समुद्रावरची भीषण शांतता माझ्या आयुष्यासारखीच भासतेय मला … वैगेरे वैगेरे
असं काही नसतं … सगळी चुत्यागिरी आहे …
हो सगळी चुत्यागिरी आहे
का कोणाच्या तरी आठवणीने डोळ्यात पाणी तरळतं ?
का कोणीतरी रस्त्यात दिसल्यावर छाती फुटेल इतकं धडधडतं?
बाप वेळेत घरी नाही आला तर का इतकी काळजी वाटते?
आई घरी नसल्यावर का चैन पडत नाही ?
एकदा पाहून आयुष्यभराची जोडीदार म्हणून निवडलेल्या बायको विषयी इतकं प्रेम कसं निर्माण होतं?
२-३ दिवस मित्र नाही भेटला तर काय रे भोसडीच्या, मादरचोद, कुठे होतास? विसरलास? एक फोन नाही करता येत असं म्हणून त्याला मिठी का मारावीशी वाटते?"

"आयुष्य असंच असतं … आयुष्य असंच होतं …
कि आयुष्य असं नसणारेय …… कि मीच आयुष्यात नसणारेय … इथून पुढे ……
एकटेच असतो आपण … रस्त्यावरून चालताना गर्दी असते पण तरी हि आपण एकटेच असतो ना . "
राजू अंधा-या किना-यावरून एकटाच चालला होता….
आता चांदोमामा त्याच्या torch ने राजू ला अंधारात वाट दाखवण्याचा निरर्थक प्रयत्न करत होता …
राजूचं अजून हि त्याच्याकडे लक्ष नव्हतं
बिच्चारा …

By
जयंत पवार

5 comments:

  1. aawadla....khoop khooop aawadla...!!!!

    ReplyDelete
  2. Nilesh Saraf..-
    Manala bhidnara ahe khupach chan...te kinarychi tambus shai ...mast shabda rachana ahe sir..khup avdla ...thank u sir share kely baddal...

    ReplyDelete